FSSAI तपासणीत मसाल्यांच्या 12 टक्के नमुन्यात आढळली भेसळ

 FSSAI तपासणीत मसाल्यांच्या 12 टक्के नमुन्यात आढळली भेसळ

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकानुशतके उत्तम दर्जाच्या मसाल्यांचे उत्पादन करणारा आपला देश गेल्या काही दिवसांपासून पाकीटबंद मसाल्यांमध्ये आढळलेल्या भेसळीमुळे गेल्या काही महिन्यांपासून जगभरात बदनाम होत आहे. एव्हरेस्ट आणि MDH या मसाल्यांमध्ये हानीकारक घटक आढळल्याचा आरोप करत काही देशांनी या मसाल्यांवर बंदी आणली होती. त्यांनंतर आता FSSAI ने केलेल्या तपासणीमध्ये देशात विकल्या जाणाऱ्या पाकीटबंद तयार मसाल्यांच्या १२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एमडीएच आणि एव्हरेस्ट व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या मसाल्यांमध्येही भेसळ आढळून आली आहे. रॉयटर्सने मिळवलेल्या माहितीनुसार, सुमारे 12 टक्के नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत मसाल्यांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशात विकल्या गेलेल्या मसाल्यांची तपासणी केली होती. यासाठी प्राधिकरणाने गुणवत्ता चाचणीसाठी देशभरातून 4054 मसाल्यांचे नमुने गोळा केले होते. यामध्ये 474 नमुने (सुमारे 12 टक्के) चाचणीत अयशस्वी झाले. या चाचण्या मे ते जुलैच्या सुरुवातीच्या काळात घेण्यात आल्या. रॉयटर्सने आरटीआय अंतर्गत ही माहिती गोळा केली आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर एफएसएसएआयने यासंदर्भात रॉयटर्सला निवेदन दिले. एफएसएसएआयने सांगितले की, ज्या कंपन्यांचे मसाले गुणवत्तेत सदोष असल्याचे आढळून आले आहे त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. काही कंपन्यांवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, एफएसएसएआयने काय कारवाई केली याबाबत काहीही सांगितले नाही.

एमडीएच आणि एव्हरेस्ट यांच्यातील मसाल्यांवरून वाद यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झाला. हाँगकाँगने या भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली तेव्हा हा वाद सुरू झाला. भारतीय मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नावाचे कीटकनाशक मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे हाँगकाँगने सांगितले. त्याच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. हा वाद समोर आल्यानंतर अमेरिका आणि सिंगापूरसह इतर देशांनीही या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

मसाल्यांमधील कीटकनाशकांचा वाद समोर आल्यानंतर एमडीएच आणि एव्हरेस्टचे वक्तव्य आले आहे. त्यांची उत्पादने वापरासाठी सुरक्षित असल्याचे या कंपन्यांनी सांगितले. या कंपन्यांनी सांगितले की त्यांचे मसाले भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

SL/ML/SL

19 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *