न्यूयॉर्क शहरात इंडिया डे परेडचे आयोजन

 न्यूयॉर्क शहरात इंडिया डे परेडचे आयोजन

न्यूयॉर्क, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात काल इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अयोध्येच्या राम मंदिरासह 40 हून अधिक झलक दाखवण्यात आल्या होत्या. तिरंगा घेऊन परेडमध्ये भारतीय लोक ढोल वाजवताना आणि नाचताना दिसले. रस्त्यावर देशभक्तीपर आणि धार्मिक गीतेही वाजवली गेली. कार्निव्हलमध्ये लाकडापासून बनवलेल्या राम मंदिराच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १८ फूट लांब, नऊ फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा चित्ररथ भारतात बनवण्यात आला आहे. परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते एअर कार्गोने न्यूयॉर्कला पाठवण्यात आले होते.

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 50 हून अधिक मार्चिंग ग्रुप्स आणि 30 मार्चिंग बँड्स व्यतिरिक्त सेलिब्रिटींनीही परेडमध्ये भाग घेतला. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही ग्रँड मार्शल होती. अभिनेते पंकज त्रिपाठी आणि भाजप खासदार मनोज तिवारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी न्यू यॉर्कमध्ये इंडिया डे परेड आयोजित केली जाते. ही परंपरा चार दशकांहून अधिक काळापासून सुरू आहे. यावर्षी 42 वी इंडिया डे परेड साजरी करण्यात आली. परेड न्यू यॉर्कमधील मॅडिसन अव्हेन्यूपासून पूर्व 38व्या स्ट्रीटपासून पूर्व 27व्या स्ट्रीटपर्यंत कूच केली.

SL/ML/SL

19 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *