परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 6,452 कोटी रुपये

 परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 6,452 कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातून मे महिन्यात आतापर्यंत 6,452 कोटी रुपये काढले आहेत. कोव्हिड-19 (covid-19) साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे गुंतवणूकीच्या भावनेवर परिणाम झाल्यामुळे बाजारातील गुंतवणूक (Investment) काढण्यात आली. डिपॉझिटरीच्या (depository) आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 14 मे दरम्यान शेअर बाजारामधून (stock market) 6,427 कोटी रुपये आणि रोखे बाजारातून (Bond market) 25 कोटी रुपये काढले. या काळात बाजारातून निव्वळ 6,452 कोटी रुपये काढण्यात आले.

तज्ञ काय म्हणतात?
What do experts say?

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) गुंतवणूक काढण्यामगे कोव्हिड (covid-19) साथीची दुसरी लाट आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात लावण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) आणि त्यामुळे जीडीपी (GDP) वाढ आणि कंपन्याच्या उत्पन्न तसेच फायद्यावर होणारा परिणाम याबद्दल चिंता आहे.
मागील महिन्यात शेअर बाजार (stock market) आणि रोखे बाजारातून (Bond market) एकूण 9,435 कोटी रुपये काढण्यात आले होते. पहिल्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 1.13 लाख कोटींपेक्षा जास्त घसरण झाली; टीसीएस, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक नुकसान झाले.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे लक्ष आता आर्थिक आकडेवारीवर
The focus of foreign portfolio investors is now on financial statistics

ग्रे चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन यांनी सांगितले की साथ आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे (Lockdown) अर्थव्यवस्थेवर (economy)झालेला प्रत्यक्ष परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु गुंतवणूकदार चिंतेत व सावध आहेत.
मॉर्निंग स्टार इंडियाचे सहसंचालक आणि संशोधन व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे (foreign portfolio investors) लक्ष आता आर्थिक आकडेवारीसह भारत किती वेगाने आर्थिक गती प्राप्त करतो याकडे आहे. जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर त्याचा नकारात्मक परिणाम होईल.
 
Foreign portfolio investors (FPI) have withdrawn Rs 6,452 crore from the Indian market so far in May. The second wave of the Covid-19 outbreak affected investment sentiment and led to the withdrawal of market capitalization. According to depository data, foreign investors withdrew Rs 6,427 crore from the stock market and Rs 25 crore from the Bond market between May 1 and 14.
 
PL/KA/PL/17 MAY 2021
 

mmc

Related post