भारताच्या परकीय चलन साठ्यात 68.9 कोटी डॉलरची वाढ

 भारताच्या परकीय चलन साठ्यात 68.9 कोटी डॉलरची वाढ

मुंबई, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 26 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 68.9 कोटी डॉलरने वाढून 584.554 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात परकीय चलन साठा 16.9 कोटी डॉलरने कमी होऊन 583.865 अब्ज डॉलरवर आला होता. त्याआधी गेल्या काही आठवड्यांपासून त्यात सातत्याने वाढ होत होती. 29 जानेवारी 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 590.185 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. आकडेवारीनुसार, 26 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (एफसीए) (Foreign currency assets) वाढल्यामुळे चलन साठ्यात वाढ झाली.
परकीय चलन मालमत्ता (Foreign currency assets) एकूण परकीय चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग असतो. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, या कालावधित एफसीए 50.9 कोटी डॉलरने वाढून 542.615 अब्ज डॉलर्स झाली आहे. एफसीए डॉलर मध्ये दर्शवली जाते, परंतु त्यात युरो, पाउंड आणि येन सारख्या इतर परकीय चलन मालमत्तेचाही समावेश असतो.
आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या साठ्याचे मुल्य 17.2 कोटी डॉलरने वाढून 35.421 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) (International Monetary Fund) मिळालेला पैसे काढण्याचा विशेष अधिकार 90 लाख डॉलरवरुन 1.517 अब्ज डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे राखीव चलन साठा किरकोळ घटून 5.001 अब्ज डॉलर वर आला आहे.
 
 
PL/KA/PL/6 MAR 2021

mmc

Related post