चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा सरकारचा अंदाज

 चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा सरकारचा अंदाज

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (Corona) संकटामुळे सरकारने चालू आर्थिक वर्षात (Current financial year) अनेक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे देशाची वित्तीय तूट (Fiscal deficit) 3.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5 टक्के राहील. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले की वित्तीय तूटीच्या स्थितीवर बारकाईन नजर आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उद्योग संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, वित्तीय तूट (Fiscal deficit) टाळणे शक्य नाही हा सरकारचा मूलमंत्र आहे. परंतु या संकटाचे निदान काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.
1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सरकारने वित्तीय तूट (Fiscal deficit) 6.8 टक्क्यांपर्यंत रहाण्याचा अंदाज वर्तविला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की अर्थसंकल्प (Budget) पूर्णपणे पारदर्शक आहे आणि सरकारने काहीही लपवलेले नाही. सरकारचे जे काही उत्पन्न आणि खर्च आहे ते सर्वांसमोर आहेत. ते म्हणाले की, सरकारला एका खासगी विकास वित्त संस्थेची (DFI) नव्हे तर अनेक खासगी विकास वित्त संस्थांची (DFI) गरज आहे.

लघु उद्योजक 25 लाखांपर्यंत कर्ज सहज घेऊ शकतील

सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राशी संबंधित उद्योजकांना आता 25 लाखांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकेल. नुकत्याच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या यंत्रणेद्वारे लघु उद्योजकांना याचा फायदा मिळणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतात सहा कोटी एमएसएमई आहेत आणि यातील लाखो उद्योजक एकट्याने व्यवसाय चालवत आहेत. ते सर्व सूक्ष्म उद्योजकांच्या श्रेणीमध्ये येतात. आरबीआयच्या नव्या यंत्रणेद्वारे प्रामुख्याने या सूक्ष्म उद्योजकांना फायदा होणार आहे. एमएसएमई गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर झालेले पूर्णपणे सरकारी हमी असलेले कर्जही 31 मार्चपर्यंत घेऊ शकतात. उद्योजकांनी सांगितले की आरबीआयच्या नव्या तरतुदीनुसार बँका त्यांच्या रोख राखीव प्रमाणामधून (CRR) एमएसएमईंना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकतात.
PL/KA/PL/9 FEB 2021

mmc

Related post