चैत्र यात्रेसाठी पहिली सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. कर्नाटकातील बेळगावची पहिली सासनकाठी जोतिबा मंदिरात दाखल झाली आहे.
या भाविकांचं तीन दिवस जोतिबा डोंगरावर वास्तव्य असतं. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चार दिवसांपूर्वी बेळगावहून बैलगाडीतून निघालेल्या जोतिबा उत्सवमूर्तीचं १२७ किलोमीटरचा प्रवास करीत जोतिबा मंदिरात आगमन झालं. Entered the first Sasankathi Jotiba mountain for Chaitra Yatra
यावेळी महिलांनी उत्सव मूर्तीचं औक्षण केलं.तर मंदिरात गावकऱ्यांनी उत्सवमूर्तीचं आणि सासनकाठीचं स्वागत केलं.
ML/KA/PGB
3 Apr. 2023