देशातील बावीस हजार पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन्स…

 देशातील बावीस हजार पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन्स…

पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील केंद्र सरकारच्या अख्यारित येत असलेल्या एआरएआयच्यावतीने जलदगतीने चार्जींग होणा-या 100 KW DC.. फास्ट चार्जरची निर्मीती करण्यात आली असून त्याच आज लोकार्पण चाकण इथल्या एआरएआयच्या प्लँटमधून केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या उपस्थित करण्यात आले.Electric charging stations at 22 thousand petrol pumps in the country…

यानतंर पांडे यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक क्षेत्रांशी निगडीत विविध कंपन्याशी सामजस्य करारही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरचा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने मेक इन इंडियाच्या माध्यमातून हे चार्जीग स्टेशन तयार करण्यात आले आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची भविष्यातील वाढती संख्या पाहता त्यांंना जलदगतीने चार्जींग करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

त्यानुसार रस्ते वाहतुक मंत्रालय,अवजड उद्योग खाते,पेट्रोलियम मंत्रालया यांच्याशी संवाद करुन पहिल्या टप्यात देशातील बावीस हजार पेट्रोलपंपावर हे चार्जीग स्टेशन तयार करण्यात येणार आहे. याकरता एआरएआयला मंजुरी देण्यात आल्याचे महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितले.इलेक्ट्रीकच्या क्षेत्रात अनेक विविध स्टार्टअप येत असून तरुणांना केंद्रबिंदू ठेवून हे मोदी सरकार काम करत असल्याचे पांडे यांनी यावेळी सांगितले.

ML/KA/PGB
19 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *