अर्थव्यवस्था खुली होत असल्याचा यावर पडला प्रभाव

 अर्थव्यवस्था खुली होत असल्याचा यावर पडला प्रभाव

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सणासुदीच्या काळात वस्तू आणि सेवा कर संकलनाने विक्रम नोंदवला आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन (GST collection) 1.30 लाख कोटी रुपये झाले आहे. एप्रिल 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एवढे संकलन होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एप्रिल 2021 मध्ये जीएसटीमधून 1.41 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते.

जीएसटी संकलनात 24 टक्क्यांची वाढ
24 per cent increase in GST collection

वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये जीएसटीचे एकूण संकलन 130,127 कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात (GST collection) 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 2019 च्या ऑक्टोबरच्या तुलनेत त्यात 36 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 ची तुलना केली तर त्यावेळी जीएसटी संकलन 1.17 लाख कोटी रुपये होते.

व्यवसायात वाढ होत आहे
The business is growing

जीएसटीच्या संकलनात झपाट्याने होणारी वाढ व्यवसायात वाढ होत असल्याचे संकेत देत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशात कोविड-19 च्या (covid-19) दुसऱ्या लाटेचा प्रभाव होता, परंतु तिसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. अर्थव्यवस्थेतील (economy वेगाने सुधारणांमुळे सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये जीएसटीचे एकूण संकलन 1.12 लाख कोटी रुपये होते, तर जुलैमध्ये ते 1.16 लाख कोटी रुपये होते.

जूनमध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटींपेक्षा कमी होते
GST collection in June was less than Rs 1 lakh crore

जूनमध्ये जीएसटी संकलन (GST collection) 92,849 कोटी रुपये, तर एप्रिल आणि मेमध्ये ते 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. कोरोनाचा कमी प्रभाव आणि जलद लसीकरणामुळे आता देशात सर्व क्षेत्रे सुरू झाली आहेत. अगदी चित्रपट गृह आणि तरणतलावांपासून ते शाळा-महाविद्यालयेही आता सुरू होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाल्याने व्यवसाय पुन्हा रुळावर आले आहेत. यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे.
सरकारने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात सीजीएसटीचा हिस्सा 23,861 कोटी रुपये, एसजीएसटीचा हिस्सा 30,421 कोटी रुपये आणि आयजीएसटीचा हिस्सा 67,361 कोटी रुपये होता. वस्तूंच्या आयातीवर एकत्रित आयजीएसटी 32,998 कोटी रुपये जमा झाला. उपकरापोटी 8,484 कोटी रुपये प्राप्त झाले.
सरकारने निवेदनात म्हटले आहे की, दर महिन्याला तयार होणाऱ्या ई-बिलांच्या कलावरून हे स्पष्ट होते की व्यवसाय तेजीत आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की जर सेमीकंडक्टर आणि इतर चिपमुळे वाहन आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता, तर जीएसटी संकलन जास्त झाले असते. चिपच्या तुटवड्यामुळे सध्या वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर वाईट परिणाम होत आहे. मारुतीसारख्या कंपन्यांनी सांगितले की चिपच्या तुटवड्यामुळे सप्टेंबरमध्ये त्यांच्या 1.66 लाख वाहनांच्या विक्रीत घट झाली.
Goods and services tax collection has set a record during the festive season. GST collection in October stood at Rs 1.30 lakh crore. This is the second time since GST was introduced in April 2017. Earlier, in April 2021, Rs 1.41 lakh crore was collected from GST.
PL/KA/PL/2 NOV 2021
 

mmc

Related post