थेट कर संकलनात शंभर टक्के वाढ
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे महिने अत्यंत आव्हानात्मक असूनही, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत थेट कर संकलन (direct tax collection) 28780 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच काळात ते 11714 कोटी रुपये होते.
शंभर टक्क्याहून अधिक वाढ
More than one hundred percent increase
कर संकलनाच्या बाबतीत सरकारला चांगले यश मिळत आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात निव्वळ थेट कर संकलनात (direct tax collection) 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी थेट कर संकलनाची आकडेवारी 1,85,871 कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ती 92,762 कोटी रुपये होती. अशाप्रकारे, त्यात 100.4 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. निव्वळ थेट कर संकलनात कॉर्पोरेशन कर (सीआयटी), 74,356 कोटी रुपये आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन कर(एसआयटी) सह वैयक्तिक आयकर 1,11,943 कोटी रुपये आहेत.
2021-22 या आर्थिक वर्षासाठी थेट कराचे एकूण संकलन (direct tax collection) (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) 2,16,602 कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी याच काळात ते 1,37,825 कोटी रुपये होते. त्यात कॉर्पोरेशन कर (सीआयटी) 96,923 कोटी रुपये आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन कर (एसआयटी) सह वैयक्तिक आयकर 1,19,197 कोटी रुपये आहे.
146 टक्क्यांची वाढ
An increase of 146 per cent
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे महिने अत्यंत आव्हानात्मक असूनही, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत थेट कर संकलन (direct tax collection) 28780 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच काळात ते 11714 कोटी रुपये होते. अशा प्रकारे त्यात 146 टक्के वाढ झाली आहे. यात कॉर्पोरेशन टॅक्स (सीआयटी) 18,358 कोटी रुपये आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसआयटी) सह वैयक्तिक आयकर (पीआयटी) 10,422 कोटी रुपये समाविष्ट आहे.
The government is doing well in terms of tax collection. Despite the extremely challenging months of the new financial year, direct tax collection in the first quarter of FY 2021-22 stood at Rs 28,780 crore. It was Rs 11,714 crore during the same period last year.
PL/KA/PL/17 JUNE 2021