हे प्रख्यात दिग्दर्शक बनवणार दादासाहेब फाळकेंवर चित्रपट

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आता एका भव्य चित्रपटाची निर्मिती होणार आहे. बाहुबली, RRR चित्रपटांचे निर्माते एसएस राजामौली दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे शीर्षक असेल– मेड इन इंडिया. या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कक्कर असतील. अलीकडेच राजामौली यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.या चित्रपटासाठीचे कलाकार अद्याप ठरलेले नाहीत.
राजामौली यांचा मुलगा एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट मराठी, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये लिहिले आहे की- भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक लोकांवर अनेक प्रकारचे बायोपिक बनवले गेले आहेत. आता भारतीय सिनेमावर बायोपिक बनवला जात आहे. एसएस राजामौली येत आहेत– मेड इन इंडिया!
सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करताना राजामौली यांनी लिहिले- चित्रपटाचे वर्णन प्रथमच ऐकून मी खूप भावूक झालो. कोणाचाही बायोपिक बनवणे सोपे नाही. पण, भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर बायोपिक बनवण्याचा विचारही करणं अवघड होतं. या चित्रपटासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत.. मेड इन इंडिया!
दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनकदेखील म्हटले जाते. फाळके यांनी १९१३ मध्ये पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट बनवला – राजा हरिश्चंद्र. यानंतर त्यांनी आणखी २७ लघुपट बनवले. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ९० चित्रपट बनवले.
SL/KA/SL
19 Sept. 2023