कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने वाढीचा अंदाज घसरला

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने वाढीचा अंदाज घसरला

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बर्‍याच राज्यांत वाढणार्‍या कोरोना (corona) रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेबद्दल (economy) चिंता निर्माण झाली आहे. गुंतवणूक बँका आपल्या वाढीचे अनुमान (Growth estimates) कमी करत आहेत, तर काहीजण दुसरी लाट आणि त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी साथीचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Lockdown) परिणामातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यात लवकरच लक्षणीय सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु सद्य परिस्थिती वेगळेच सांगत आहे.

निर्बंधांमुळे काही विशिष्ट सेवांवर परिणाम
Restrictions affect certain services

गोल्डमन सॅश पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीच्या संशोधन अहवालात असे म्हटले आहे की त्यांच्या अर्थशास्त्रज्ञांनी वार्षिक जीडीपी वाढीचा (GDP growth) अंदाज 10.9 टक्क्यांवरून कमी करुन 10.5 टक्के केला आहे. गोल्डमन सॅशच्या अहवालानुसार, त्यांच्या अर्थशास्त्रज्ञांचे असे मत आहे की प्रसार रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे काही विशिष्ट सेवांवर अधिक परिणाम होईल (जसे की खाद्यपदार्थ, करमणूक आणि वाहतूक) त्याचबरोबर बांधकाम क्षेत्र आणि उत्पादन यावर त्याचे मर्यादित परिणाम होतील.

बाजार आणि ग्राहकांवर नकारात्मक परिणाम
a negative impact on the market and consumers

मूडीजने एका अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे (second wave of corona virus) आमच्या वाढीचे अंदाज संकटात आले आहेत कारण साथ रोखण्यासाठी निर्बंध पुन्हा लागू केल्याने त्याचा आर्थिक घडामोडींवर गंभीर परिणाम होईल आणि त्यामुळे बाजार आणि ग्राहकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकेल. 24 फेब्रुवारीच्या तुलनेत 24 एप्रिल पर्यंत भारतात किरकोळ आणि करमणुकीच्या घडामोडींमध्ये 25 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मार्च महिन्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ग्राहक विश्वास सर्वेक्षणात याचा उल्लेख करण्यात आला होता.

जीडीपीचे नुकसान
Loss in GDP

वित्त क्षेत्रातील आघाडीच्या बार्कलेज चे म्हणणे आहे की महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थानसारख्या आर्थिक केंद्र मानल्या जाणार्‍या राज्यांमधील लोकांच्या हालचालींवर सध्याच्या निर्बंधांमुळे जीडीपीला (GDP) आठवड्यात 1.3 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जर सद्य परिस्थिती मे अखेरपर्यंत कायम राहिली तर एकूण तोटा 10.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकेल. बार्कलेजने आपला 11 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे, परंतु निर्बंध आणखी कडक झाले तर आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असा इशारा दिला आहे.
 
The growing number of corona patients in many states of the country has raised concerns about the economy. Investment banks are lowering their growth estimates, while others are expressing concern about the second wave and its aftermath. The second wave of corona has hit the country as the economy improves as a result of the lockdown imposed last year to stem the spread of the epidemic. It was expected to improve significantly soon, but the current situation is different.
PL/KA/PL/15 APR 2021
 

mmc

Related post