किरकोळ कर्जाच्या गुणवत्तेवर पुन्हा संकट

 किरकोळ कर्जाच्या गुणवत्तेवर पुन्हा संकट

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रकरणांमुळे किरकोळ कर्जाच्या (retail loans) गुणवत्तेबद्दल चिंता पुन्हा वाढली आहे. गुंतवणूकीशी संबंधित माहिती देणारी कंपनी इक्राने म्हटले आहे की विशेषत: बिगर-बँकिंग वित्त कंपन्या (एनबीएफसी) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यानी (एचएफसी) वितरित केलेल्या कर्जाच्या गुणवत्तेवर (quality of loans) परिणाम होऊ शकतो. एका अहवालात इक्राने म्हटले आहे की निर्बंधांमुळे एनबीएफसीच्या अशा वसुलीवर मोठा परिणाम होईल जी अत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि ज्यात अजूनही रोखीचे व्यवहार खूप जास्त होत असतात.
 

व्यावसायिक वाहनांच्या कर्जाच्या गुणवत्तेवरही परिणाम
Also affects the quality of commercial vehicle loans

इक्राच्या मते, जर राज्यांमधील व्यवहार पुन्हा एकदा बंद करण्यात आले तर व्यावसायिक वाहनांवरील (commercial vehicles) कर्जावरही दबाव दिसून येऊ शकेल. महाराष्ट्र आणि दिल्लीसह इतर अनेक भागात अनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक वाहने चालविणार्‍या कंपन्या त्यांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करु शकत नाहीत. याचा परिणाम व्यावसायिक वाहनांच्या कर्जाच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो.

गृहनिर्माण कर्ज क्षेत्र जीवित राहील
The housing loan sector will survive

परंतू संस्थेचे म्हणणे आहे की या आव्हानात्मक काळातही गृहनिर्माण कर्ज क्षेत्र (housing loan sector) गेल्या वर्षी अशा संकटाच्या वातावरणात दिसून आले होते तसेच जीवित राहील, याचे कारण हे एक सुरक्षित कर्ज मानले जाते आणि ग्राहक देखील ते परतफेड करण्यास प्राधान्य देतात. इक्राचे उपाध्यक्ष आणि स्ट्रक्चर्ड फायनान्स रेटिंग्स प्रमुख अभिषेक डफरिया म्हणाले की सध्या सर्व निर्बंध स्थानिक पातळीपर्यंतच मर्यादित आहेत आणि तितकेसे कठीण नाहीत. परंतु कोरोनाची (corona) तीव्रता दिवसेंदिवस भयावह होत आहे कारण ती अजुनही नियंत्रणात आलेली नाही.

सिक्युरिटीज व्हॉल्युममध्ये घट
Decrease in securities volume

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून 2020 मध्ये सिक्युरिटीजचा व्हॉल्युम (securities volume) घटून 7,500 कोटी रुपयांवर आला होता. याचे कारण म्हणजे मार्चच्या चौथ्या आठवड्यात केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी (nationwide Lockdown) लावली होती. मात्र टाळेबंदीमधून सूट मिळाल्या नंतर त्यात तेजी दिसून आली आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च 2021 या शेवटच्या तिमाहीत तो 40,000 कोटी रुपयांवर पोहोचला. इक्राचे मत आहे की कोरोनाच्या (corona) या दुसर्‍या लाटेमध्ये सिक्युरिटीजच्या व्हॉल्युममध्ये पुन्हा घट होऊ शकते. यामागचे कारण असे आहे की एनबीएफसी आणि एचएफसी संपूर्णपणे विचार करुन कर्ज देतील.

ऑक्सिजनच्या कमतरतेचा पाच क्षेत्रावर परिणाम
Oxygen deficiency affects five sectors

विश्लेषण क्षेत्राची जागतिक कंपनी क्रिसिलने म्हटले आहे की औद्योगिक ऑक्सिजनच्या (Industrial Oxygen) कमतरतेमुळे पाच क्षेत्रांवर सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. यामध्ये मेटल फॅब्रिकेशन, ऑटो कंपोनंट्स, जहाज तोडणी म्हणजेच कार्यकाळ संपलेल्या जहाजांना तोडण्याचा व्यवसाय, कागद व अभियांत्रिकी यांचा समावेश आहे.
 
क्रिसिल रेटिंगचे संचालक गौतम शाही म्हणाले की या क्षेत्रातील छोट्या कंपन्यांच्या व्यवसायावर सध्या परिणाम होऊ शकतो. क्रिसिल म्हणणे होते की या संकटाच्या काळात मानवी जीवनाचे संरक्षण करणे अधिक महत्वाचे आहे. असे असूनही, हे खरे आहे की औद्योगिक ऑक्सिजनचा (Industrial Oxygen) पुरवठा बंद झाल्याने काही क्षेत्रांच्या व्यवसायावर परिणाम होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी जवळपास पाच पट वाढली आहे.
The growing cases of corona have again raised concerns about the quality of retail loans. ICRA, an investment information company, said in particular the quality of loans disbursed by non-banking finance companies (NBFCs) and housing finance companies (HFCs) could be affected.
PL/KA/PL/26 APR 2021
 

mmc

Related post