जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोरोनाच्या वस्तूंच्या कर कपातीवर चर्चा होणार

 जीएसटी परिषदेच्या बैठकीत कोरोनाच्या वस्तूंच्या कर कपातीवर चर्चा होणार

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (GST) परिषदेच्या पुढच्या बैठकीत राज्यांना भरपाई कमी मिळत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर कोरोनाच्या (corona) सामग्रीवरील कर दर कमी करण्याबाबतही चर्चा होईल. 28 मे रोजी होणार्‍या बैठकीत, वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरच्या (oxygen concentrator) आयातीवरील 12 टक्के करात कपात करण्याचा निर्णय होऊ शकेल.
 

वस्तू व सेवा कर चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयानेही म्हटले आहे
The High Court has also ruled that the GST is wrong

दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात म्हटले होते की वैयक्तिक वापरासाठी किंवा भेटवस्तू म्हणून मिळालेल्या ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरवर (oxygen concentrator) 12 टक्के एकत्रित वस्तु व सेवा कर (IGST) लावणे “घटनाबाह्य” आहे. एका 85 वर्षीय कोव्हिडच्या रूग्णाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. कर तज्ज्ञांनी सांगितले की परिषद अशा आयात केलेल्या वस्तूंवर एकत्रित वस्तु व सेवा करावर सवलत देण्याचा निर्णय घेऊ शकते. कारण त्यातून जास्त महसूल मिळणार नाही.
 

विनामूल्य आयातीवर सूट देण्यात आली होती
Free imports were discounted

कर तज्ज्ञांच्या मते, सरकारने यापूर्वी एखाद्या राज्य सरकारच्या अधिकृत एजन्सीकडून ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरच्या (oxygen concentrator) मोफत आयातीवर एकत्रित वस्तु व सेवा करात (IGST) सूट दिली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने वैयक्तिक वापरासाठी भेट म्हणून वैयक्तिक आयातीसाठी एकत्रित वस्तु व सेवा करात सवलतीचा लाभ दिला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या सवलतीचा सरकारच्या तिजोरीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे सरकार यावर निर्णय घेऊ शकते.
एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांनी सांगितले की ज्या वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे लाखो लोकांचा मृत्यू होत आहे, अशी औषधे आणि लशीवर शुल्क घेणे ही देशातील मूलभूत तत्त्वांच्या (fundamental principles) विरोधात आहे. कोव्हिडशी संबंधित सामग्रीसाठी किंमती कमी करण्याची आवश्यकता आहे.
 

वस्तू महाग होतील
Items will become expensive

केंद्राने यापूर्वी कोव्हिडची लस, औषधे आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरवर वस्तु व सेवा कर (GST) लावण्यामध्ये सवलत देण्यास नकार देताना असे म्हटले होते की अशा सवलतीमुळे ग्राहकांसाठी जीवनसंरक्षक वस्तू महाग होतील.
 

सध्या लशीच्या पुरवठ्यावर 5 टक्के वस्तु व सेवा कर
Currently, 5 per cent goods and services tax on the supply of vaccines

सध्या लशीचा पुरवठा आणि व्यावसायिक आयातीवर 5 टक्के वस्तु व सेवा कर (GST) आकारला जातो. तर कोव्हिड औषधे आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरवर 12 टक्के कर आकारला जात आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केल्या जाणार्‍या काँन्स्ट्रेटरवर सरकारने 1 मे रोजी एकत्रित वस्तु व सेवा कराचा दर 28 टक्क्यांवरुन कमी करुन 12 टक्के केला होता. कमी केलेला दर 30 जूनपर्यंत लागू असेल.
 

राज्य आणि केंद्र सरकार पन्नास-पन्नास टक्के कर आकारतात
The state and central governments levy fifty per cent tax

वस्तु व सेवा करा अंतर्गत वस्तुंची विक्री किंवा सेवा पुरवण्यावर आकारण्यात येणारा कर केंद्र आणि राज्य यांच्यात पन्नास-पनास टक्के आहे. अशा प्रकारच्या कराला केंद्रिय वस्तु व सेवा कर किंवा सीजीएसटी आणि राज्य-वस्तु व सेवा कर किंवा एसजीएसटी असे म्हणतात. मालासह आयातीच्या आंतरराज्य वाहतूकीवर एकत्रित वस्तु व सेवा कर आकारला जातो जो केंद्राला मिळतो.
 
The next meeting of the Goods and Services Tax (GST) Council may discuss the issue of reduced compensation to states. There will also be discussions on reducing the tax rate on corona content. At a meeting on May 28, it may decide to reduce the tax on imports of oxygen concentrator to 12 per cent for personal use.
 
PL/KA/PL/25 MAY 2021

mmc

Related post