कोरोनाचा नोकरदार वर्गावर परिणाम

 कोरोनाचा नोकरदार वर्गावर परिणाम

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील औपचारिक क्षेत्रात (formal sector) काम करणार्‍या नोकरदार वर्गावर (workin class) कोरोनाचा (Corona) वाईट परिणाम झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2020 ते 12 मे या कालावधीत 3.5 कोटी कर्मचार्‍यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून 1.25 लाख कोटी रुपये काढले आहेत. आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सहा कोटी ग्राहकांपैकी निम्म्याहून अधिक ग्राहकांनी कोरोना काळात पैसे काढले आहेत.

संघटनेने 2019 मध्ये 81,200 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले
Organization settled claims worth Rs 81,200 crore in 2019

आकडेवारीनुसार काढण्यात आलेल्या 1.25 कोटी रुपयांमध्ये भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, मृत्यू विमा आणि हस्तांतरणाच्या रुपाने निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांचाही समावेश आहे. एका वृत्तात हे सांगण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 81,200 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले होते. वृत्तानुसार 1 एप्रिल 2020 ते 12 मे 2021 या कालावधीत 72 लाख कर्मचार्‍यांनी कोरोना (Corona) परत न करण्यायोग्य आगाऊ रक्कम घेतली आहे. या कर्मचार्‍यांनी 18,500 कोटी रुपये आगाऊ रक्कम घेतली आहे.

मार्च 2020 मध्ये सरकारने आगाऊ रकमेची सुविधा दिली होती
In March 2020, the government had provided an advance facility

मार्च 2020 मध्ये, केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ग्राहकांना रक्कम आगाऊ घेण्याची सुविधा दिली होती. याअंतर्गत, ग्राहक त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकत होते. यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येत होती. ही रक्कम परत न करण्यायोग्य आगाऊ रक्कम होती.
 

पैसे काढण्यामध्ये 10 टक्क्यांची वाढ
10 per cent increase in withdrawals

अहवालानुसार, वार्षिक आधारावर पैसे काढण्यामध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. जास्त सेवानिवृत्ती आणि नोकरीतील बदल ही त्याची मुख्य कारणे आहेत. कोविड-19 पैसे काढल्यामुळे यात महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. एक्सएलआरआयचे प्राध्यापक के आर श्याम सुंदर यांचे म्हणणे आहे की कोरोनामुळे (Corona) प्रति व्यक्ती सरासरी 25 हजार रुपये काढण्यात आले. याचा अर्थ मासिक सरासरी कमाई 8 ते 9 हजार रुपये इतकी होती. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर कोविड-19 काळात पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ अकुशल आणि कमी पगार असलेल्या लोकांनी घेतला आहे.
Corona has had a detrimental effect on the country’s working class in the formal sector. According to the Employees Provident Fund Organization (EPFO) data from April 1, 2020 to May 12, 3.5 Crores of employees have withdrawn Rs 1.25 lakh crore from their provident fund accounts.
PL/KA/PL/19 MAY 2021
 

mmc

Related post