पर्यावरण पूरक, बिर्ला ऑप्स रंग

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच बाजारात आलेल्या आदित्य बिर्ला समूहाच्या उत्पादने, त्यांची गुणवत्ता, त्यांचा दर्जा याची सर्व माहिती ग्राहक, विक्रेते, होलसेलर, एजंट आदी सर्वांना व्हावी, म्हणून कंपनीतर्फे देशभरात सव्वाशेपेक्षा जास्त प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. आज मुंबईत आयोजित प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.
रंगांचे उत्पादन करताना ते पर्यावरणपूरक राहील, याची काळजी घेतली जाते. कंपनीतून कोणतीही घातक रसायने किंवा द्रव्य बाहेर पडत नाहीत. किंबहुना कंपनीने अनेक ठिकाणी सौरऊर्जा पॅनल लावले असून त्याद्वारे मिळणारी वीजच उत्पादनासाठी वापरली जाते, असेही ते म्हणाले. कंपनीचे रंग स्पर्धकांपेक्षा जास्त गुणवत्तापूर्ण असून खुर्च्या ठेवल्याने भिंतीला डागही पडत नाहीत किंवा पडले तरी ते सहजपणे पुसता येतात. प्रत्यक्ष रंग देताना त्याचे थेंब जमिनीवर किंवा कामगारांच्या अंगावरही पडत नाहीत, त्यामुळे कामगारांचा वेळ आणि श्रम वाचतात, असेही ते म्हणाले.
PGB/ML/PGB
1 Aug 2024