T20 विश्वचषक स्पर्धेतून यजमान ऑस्ट्रेलिया बाहेर

 T20 विश्वचषक स्पर्धेतून यजमान ऑस्ट्रेलिया बाहेर

सिडनी,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियामध्ये  १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ICC-T-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. सेमी फायनलमध्ये स्थान निश्चितीसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार होता.

या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आणि सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर १२ फेरीतूनच माघार घ्यावी लागली आहे.

दरम्यान या सामन्यात  श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत  २० षटकात ८ बाद १४१ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा चांगल्या सुरूवातीनंतर डाव घसरला अखेर बेन स्टोक्सने ३६ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी करत सामना जिंकून दिला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला.

१३ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यामध्ये आता कोणत्या दोन संघांची  वर्णी लागते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे.

SL/KA/SL

5 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *