कुर्ल्यातील आगीत 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

 कुर्ल्यातील आगीत 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुर्ल्यातील एका १२ मजली इमारतीला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहे .जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.A 70-year-old woman died in a fire in Kurla

कुर्ला (प.)येथील कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून दहाव्या मजल्यापर्यंत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढून गच्चीवर नेले. या दुर्घटनेत शकुंतला रामाणी या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत गच्चीवर अडकलेल्या सर्व रहिवाशांना जिन्यावरून सुखरूप खाली आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आग विझवण्यात आली आहे. या दुर्घटनेत गुदमरल्यामुळे नऊ जणांना त्रास झाला होता. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य आठ जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे .A 70-year-old woman died in a fire in Kurla

ML/KA/PGB
15 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *