नागपूरात सूर्याभोवती अद्भुत नजारा …

नागपूर, दि. २२ : नागपूरच्या आकाशात काल नागपूरकरांनी सुर्याभोवताली मोठे रिंगण बघितले. ढगाळ वातावरण असल्यामुळे हे दृश्य पाहताना सूर्याच्या प्रखर किरणांचा कसलाही त्रास झाला नाही. ज्याप्रमाणे आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसून येते, अगदी त्याचप्रमाणे कधीकधी सूर्याच्या भोवताली वर्तुळाकार तेजस्वी कडे निर्माण होते. ग्रामीण भाषेत याला चंद्राप्रमाणे सूर्याला खळे पडणे म्हणतात. खगोलीय भाषेत याला सोलर हॅलो म्हटले जाते. हे पूर्ण इंद्रधनुष्य या खळ्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती अंदाजे 22 त्रिज्येचे वर्तुळाकार कडे निर्माण होते. हे आकाशातील हिम कणांमुळे तयार होते.