उद्या वसंत व्याख्यानमालेत या नेत्याची तोफ धडाडणार.

मुंबई, दि 15
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. छगन भुजबळ यांची तोफ उद्या दि. 16 मे रोजी सायं. 7:15 वाजता वसंत व्याख्यानमालेत धडाडणार आहे.
देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट नाशिक येथे स्व. वसंतराव नेवासकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे 16वे पुष्प गुंफणार आहेत. ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्वीप्रमाणे 27% ओबीसी आरक्षणासह येत्या 4 महिन्यात घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच गेली दहा दशके विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून भारतात जातनिहाय जनगणना करावी आणि त्यानुसार विकासाची दिशा आणि अर्थसंकल्पीय तरतुद व्हावी अशी मागणी केली जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या दोन्हीही प्रश्नांबाबत समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ सातत्याने देशपातळीवर आवाज उठवित राहिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याप्रश्नी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता वसंत व्याख्यानमालेत भुजबळ काय भूमिका मांडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकारिणीने केले आहे.