कोरोना संकटातही मे महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा जास्त

 कोरोना संकटातही मे महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा जास्त

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (corona) दुसरी लाट शिगेला पोहोचल्यानंतरही यंदा मे महिन्यात जीएसटी संकलन (GST Collection) 1,02,709 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या मे च्या तुलनेत ही रक्कम 65 टक्के जास्त आहे. परंतू यावर्षी कोरोना संकटाच्या दुसर्‍या लाटेदरम्यानही एप्रिलमधील जीएसटी संकलन विक्रमी 1.41 लाख कोटी रुपये होते. परंतु मे चे संकलन एप्रिलच्या तुलनेत 27 टक्के कमी आहे. मात्र चांगली गोष्ट म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांच्या वर होते आणि मे मध्येही हा कल कायम आहे.

प्रत्यक्ष जीएसटी संकलन 1.02 लाख कोटींपेक्षा जास्त असू शकते
Actual GST collection could be more than Rs 1.02 lakh crore

मे महिन्यासह मागील आठ महिन्यांपासून जीएसटी संकलन (GST Collection) एक लाख कोटींपेक्षा जास्त होत आहे. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की मे महिन्यातील प्रत्यक्ष जीएसटी संकलन 1.02 लाख कोटींपेक्षा जास्त असू शकते, कारण कोरोनामुळे (corona) व्यापार्‍यांना जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठीच्या कालावधीत सूट देण्यात आली होती. सामान्य परिस्थितीत व्यापार्‍यांना महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जीएसटी विवरणपत्र भरावे लागते.

व्यापार्‍यांना सूट देण्यात आली होती
Traders were given concession

पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांना जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी 15 दिवसांची सूट देण्यात आली होती. अशाप्रकारे त्यांनी 4 जूनपर्यंत विवरणपत्र भरले. पाच कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोणतेही विलंबशुल्क न देताविवरणपत्र भरण्याची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या बर्‍याच व्यापार्‍य़ांनी विवरणपत्र भरले नाही. त्यामुळे मे महिन्यातील प्रत्यक्ष जीएसटी संकलन (GST Collection) जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतरच कळू शकेल.

आयातीपासून मिळालेल्या जीएसटीमध्येही वाढ
Increase in GST on imports

वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात जीएसटी संकलनात (GST Collection) 17,592 कोटी रुपये सीजीएसटी, 22,653 कोटी रुपये एसजीएसटी आणि 53,199 कोटी रुपये आयजीएसटी म्हणून वसुल करण्यात आले. उपकर म्हणून सरकारला 9,265 कोटी रुपये मिळाले. ही आकडेवारी 4 जूनपर्यंतची आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, मे महिन्यात वस्तूंच्या आयातीपासून मिळालेला जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 56 टक्के जास्त होता. तर गेल्या महिन्यात देशांतर्गत व्यवहारात (सेवांच्या आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 69 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जीएसटी तज्ज्ञांच्या मते, मे महिन्याच्या संकलनावरुन असे दिसून येते की अनेक राज्यांमध्ये टाळेबंदी असूनही आर्थिक घडामोडी सुरु राहिल्या. जीएसटी संकलन (GST Collection) थेट विक्रीशी जोडला गेला आहे, जी हे दर्शविते की वस्तुंची विक्री मेमध्येही सुरू होती. तज्ज्ञांच्या मते, केंद्राने देशव्यापी टाळेबंदी केली असती तर जीएसटीचे संकलन या पातळीपर्यंत कधीच पोहोचु शकले नसते. अनेक तज्ज्ञ असेही म्हणतात की बहुतांश राज्यांत मे दरम्यान जवळपास पूर्ण टाळेबंदीसारखी परिस्थिती असूनही जीएसटी संकलनाची आकडेवारी 1 लाख कोटींच्या पुढे गेली आहे, जे एक सुखद आश्चर्य आहे.
 
Even after the second wave of corona reached its peak, GST collection in May this year stood at Rs 1,02,709 crore. This is an increase of 65 per cent over May last year. But even during the second wave of the Corona crisis this year, GST collection in April was a record Rs 1.41 lakh crore.
PL/KA/PL/7 JUNE 2021
 

mmc

Related post