अनधिकृत भोंग्यांसाठी आता पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार…

 अनधिकृत भोंग्यांसाठी आता पोलिस ठाण्याचा प्रभारी जबाबदार…

मुंबई, दि. ११(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विविध प्रार्थना स्थळांवर लावण्यात येणारे भोंगे नियमाचे उल्लंघन करून वापरण्यात येत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारीवर निश्चित करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.

ही लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली होती त्यावर अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न विचारले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवसाची आणि रात्रीची संबंधित भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन होत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी त्यावर तातडीने कारवाई करेल आणि या जबाबदारी निश्चितीसाठी संबंधित कायद्यातच्या नियमात बदल करण्यासाठीची विनंती केंद्र सरकारकडे केली जाईल असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं
नागपूर सुधार प्रन्यास समिती
नागपूर सुधारण्यास अंतर्गत असणाऱ्या अनेक भूखंडांवर झालेल्या घरांची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या अर्जांचा एका वर्षाच्या आत निपटारा करून ती निकाली काढण्यासाठी एक विशेष समिती नेमली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केली होती, त्यावर विकास ठाकरे, नितीन राऊत, मोहन मते, प्रवीण लटके आदींनी उपप्रश्न विचारले.
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या 842 प्रकरणांपैकी 229 प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत . आता 615 प्रकरणे शिल्लक असून त्यासाठी 15262 भूखंड शिल्लक आहेत अशी माहिती याआधी प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली होती .

दारूच्या दुकानासाठी नवीन कायदा
राज्याच्या शहरी भागामध्ये असणाऱ्या रहिवासी इमारतींमध्ये असणारी बिअर शॉप आणि दारूची दुकानं स्थलांतरित करताना यापुढे संबंधित गृहनिर्माण सोसायटीकडून ना हरकत दाखला घेतला जाईल, त्यानंतरच त्यांचे स्थलांतर करण्यात येईल आणि त्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना महेश लांडगे यांनी उपस्थित केली होती.
ML/ML/ SL
11 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *