नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

 नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) :

दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुपारी १६ वाजून २८ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४७ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “विश्वावसूनाम ” आहे.

संवत्सराचे फळ — या वर्षात सरकारमध्ये अस्थिरता राहील. कर म्हणजेच टॅक्स वाढतील. अन्नधान्य महाग /महागाई वाढेल. कमी पीक येईल. गहू/ज्वारी/तांदूळ/चणा/कापूस इत्यादी शेतीला नुकसान. तेल तसेच तूप महाग होईल. दूध महागणार. रोगराईत भयंकर वाढ.

नवीन वर्षाची पत्रिका ही रवी लग्नाची आहे. आणि ह्या वर्षी जास्तीत जास्त ग्रह हे अष्टम स्थानी आहेत.

आगामी वर्ष आपल्या देशाला कसे जाईल ?

सत्तेविरुद्ध अचानक बंड/खळबळ , तसेच राजकीय परिस्थितीत अचानक फेरबदल. अधिकाऱ्यांसाठी प्रतिकूल/त्रासदायक. काही जणांचा सत्ता घालवण्याचा प्रयत्न. पक्षात दुही तसेच असांतोष/तीव्र मतभेद वाढतील. राजकारणात मोठ्या भानगडी निर्माण होतील. सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मालिन होण्याची शक्यता. सरकारच्या अडचणीत वाढ. राजकारणातील हेवेदावे वाढतील. मंत्रिमंडळातील भांडणे/गैरसमज वाढतील, पक्षातील गळती सुरु राहील, पक्षातील युती /स्नेहभाव यात ताण निर्माण होईल.( पाठीत खंजीर खुपसणे ,पक्ष फुटणे)

सरकारमध्ये अनपेक्षित बदल. काही राज्यात नवीन समीकरणे /बदल. मोठ्या अधिकारांच्या बदल्या.

राजकारणात फसवणुकीचे प्रकार अनुभवयास मिळतील. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे किंवा नेत्याचे आसन डळमळीत होणार (डोक्यावर टांगती तलवार). काही ठिकाणी मुख्यमंत्री बदल. पक्ष फोडणे/ नेत्यांवर खोटे आरोप ,कौर्टात खेचणे. लोकसभेतील चर्चेत वादविवाद तसेच काही वादग्रस्त विधाने (खालच्या पातळीवरील). मंत्रिमंडळात बदल. देशावर आर्थिक संकटे / महाराष्ट्र राज्यावर देखील आर्थिक संकट. सांपत्तिक स्थितीच्या दृष्टीने प्रतीकूल. देशाच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल.

काही बँका / पतसंस्था अडचणीत येण्याची शक्यता.
लोकसभा/राज्यसभा/विधिमंडळात जोराचे वादविवाद /हाणामारी /तीव्र मतभेद.सभागृहातील सदस्यांच्या मृत्यूची शक्यता. मतदानात आपला पक्षाच्या विरोधात मतदान. सैन्याच्या खर्चासंबंधी वाद. देशाच्या सरहद्दीवर/बॉर्डरवर भयंकर अत्याचार घडतील.
सैन्याच्या जल आणि थल विभागात असंतोष पसरणार. तसेच कष्टकरी /श्रमिक यांची आंदोलने, असंतोष यांचा क्षोभ याचा सरकारला सामना करावा लागेल.

इतर राष्ट्रांसोबत काही कायदेशीर अडचणी/ मतभेद निर्माण होण्याची शक्यता. काही राष्ट्रांसोबत सामंजस्य करार भंग पावण्याची शक्यता
कलाकार/चित्रकार/गायक/स्त्रिया/श्रीमंतलोक/लेखक/ग्रंथकार/ग्रंथपाल प्रतिकूल,
मृत्यूचीशक्यता.स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेने देशभर खळबळ.

खून/दरोडे/मारामाऱ्या/अपहरण यात प्रचंड वाढ. आत्महत्या वाढतील.देशात घटस्फोटांच्या संख्येत वाढ… स्त्रियांचे अपहरण. स्त्री कलाकार अपघात /मृत्यू. रहस्यमय/ गूढ मृत्यू.
डिप्रेशनचे प्रमाण वाढेल/आत्महत्येत वाढ. विषप्रयोग/ अमली पदार्थाचे गुन्हे वाढतील

साथीचे रोग पसरतील या विषया सबंधित चर्चासत्रे घडतील.

देशाला तसेच राज्यांना जलमार्गातून धोका संभवतो. भूकंप, अवकाळी पाऊस.गोंधळ /भगदड माजून मोठी दुर्घटना /मृत्यू / रेल्वे तसेच रस्ते अपघातात वाढ/दरड कोसळणे. पाण्यात बुडणे. रेल्वे/मुनिसिपाल्टी /मजूर यांचे संप.
राजघराण्यातील/सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश/पेन्शनर/मोठ्या पदावरील व्यक्तींचे मृत्यू

देशाच्या तिजोरीत/उत्पन्नात घट.

वयोवृद्ध राजकारणी/व्यापारी/उद्योगपती/वरिष्ठ अधिकारी यांच्या मृत्यूचे योग.
शिक्षण/शाळा/अनाथगृहे,
यांना काळ चांगला नाही.तार/पोस्ट/दळणवळण/ट्रान्सपोटेशन/कम्युनिकेशन/ टेलीफोन खाते यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

नाट्यगृहे तसेच करमणुकीची साधने याच्या उद्योगात घट.विवाहसंस्थांना प्रतिकूल.विवाह संस्थेत काही कायदेशीर बदल.

फसवाफसवीचे प्रकार/स्मगलिंग/चोरीचे गुन्हे वाढतील. अंगावर शहारे आणणारे अत्याचार तसेच फसवेगिरीचे गुन्हे.
लहान मुले/लेखक/साहित्यिक/पत्रकार/बुद्धीवादी यांना प्रतिकूल मृत्यूची शक्यता. वृत्तपत्रांवर खटले.

ह्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असून. पाण्याच्या प्रश्न भेडसावेल.

पिकांचे नुकसान संभवते.पावसाचे प्रमाण कमी असले तरी,उत्तरेतील राज्ये तसेच दक्षिण प्रांत येथे पूर,अतिवृष्टी त्यामुळे मोठे नुकसान/हानी संभवते (वीज पडून दुर्घटना ,रस्ता खचणे,वाहून जाणे,घरे पडणे, पाण्यात बुडणे). महाराष्ट्रात साधारणतः १६ जून पासून सर्वत्र पावसाला सुरुवात होईल.

बँका आणि शेअर बाजार यांना हे वर्ष फारसे अनुकूल नाही. विदेशी गुंतवणूकदार ह्या वर्षी भारतात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता कमी आहे.

लेखक —

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant) शेअरबाजार
(StockMarket)/सायबर कायदा(cyberlaw),तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा (data protection law) तज्ज्ञ
आहेत.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

ML/ML/PGB 9 Mar 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *