डॉ आंबेडकर अपमान प्रकरणी विधानपरिषदेतून विरोधकांचा सभात्याग ….

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, उपसभापतीनी परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
सभापती नीलिमा गोऱ्हे यांनीही सभागृहाला पूर्व सूचना न देता अश्याप्रकारचे मत उपस्थित करण्यावर आक्षेप घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर विरोधक जनतेची दिशाभूल आणि राजकारण करीत असल्याचे मत व्यक्त केले. यावर विरोधी पक्षाचा सदस्यांनी गदारोळ केला आणि वेल मध्ये येऊन घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपसभापतींनी विरोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करीत असल्याची म्हटले यावर संतप्त होत विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला…
विधानसभेत ही काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेत राज्यसभेतील विषय इथे उपस्थित करता येणार नाही असं सांगितलं.
ML/ML/PGB
18 Dec 2024