विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गट नेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली.
दानवे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा, विधानसभा सदस्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे दानवे म्हणाले. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त गटनेतेपदी आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेता म्हणून भास्कर जाधव आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यापुढे काम पाहतील. महाराष्ट्राच्या हितासाठी येणाऱ्या काळात आम्ही लढणार असल्याचा निर्धार या बैठकीत सर्व आमदारांनी केला, असेही दानवे म्हणाले.
ML/ML/PGB 25 Nov 2024