अदानी ग्रुपच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील आरोपांसदर्भात असे दिले स्पष्टीकरण

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोप झालेली रक्कम तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकदारांचे पहिल्या तासाभरात अडीच लाख कोटींहून जास्त नुकसान झालं. अमेरिकन वकिलांनी अदानी ग्रीनच्या संचालकांवर हे आरोप करताच, शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. या प्रकरणावर आता अदाणी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे अदानी ग्रुपचे म्हणणे आहे. निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. “अमेरिकेच्या विधी विभागाकडून ‘अदाणी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत”, असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आलं आहे.