आयसीसी’मध्ये पाचवा विषय?

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :१९४०च्या दशकात याच न्यायालयात नाझी नेत्यांविरुद्ध खटला चालला आणि त्यांना शिक्षा झाली. आज या न्यायालयाच्या कक्षेत येणारे चारही अपराध हे मनुष्यप्राणी आणि मानवजात यांच्या एकंदर भल्यावर, कल्याणावर लक्ष केंद्रित करणारे आहेत. आता नव्याने समाविष्ट होऊ शकणारा पाचवा विषय हा मानवजातीशी संबंधित आहेच, पण संपूर्ण सजीवसृष्टी ज्या पृथ्वीवर नांदत आहे, त्या वसुंधरेच्या पर्यावरणाशी संबंधित आहे. हा विषय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या केंद्रस्थानी येणे आज अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
यासंदर्भात प्रा. फिलिप सँडस् यांनी व्यक्त केलेली भावना विचारात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात, पर्यावरणनाशाची निश्चित अशी व्याख्या करणे आणि ती आयसीसीने स्वीकारणे याला माझ्या दृष्टीने एक व्यापक महत्त्व आहे. याचे कारण लोकांच्या जाणिवा सजग करणे, आपले नाते पर्यावरणाशी आहे हे त्यांच्या मनावर ठसवणे आणि आपल्या सुखी-समाधानी जीवनासाठी आपले पर्यावरण उत्तम असणे गरजेचं आहे, ही वस्तुस्थिती त्यांच्या मनामध्ये बिंबवणे या साऱ्या गोष्टी एका फार मोठ्या लढ्यासाठी आवश्यक आहेत. या साऱ्या प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली आणि कायद्याचे शस्त्र आपल्या हाती आले, तर पर्यावरणाच्या रक्षणाच्या कामाला अधिक धार येऊ शकेल.
ML/ML/PGB 26 Aug 2024