अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी. दोन किलोमीटर रांगा…
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मनोज जरांगेंनी निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे त्यासाठी अंतरवाली सराटीत बहुजन समाज एकवटला आहे. यामुळे जालन्याच्या अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. रस्त्यावर 2 किलो मीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. या बैठकीसाठी राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने बहुजन समाज अंतरवाली सराटीत जमा झाला आहे. जरांगेंनी निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत अशी मागणी इच्छुक उमेदवार जरांगेंकडे बोलून दाखवत आहेत. अंतरवाली सराटीत आज बहुजन समाज मोठ्या संख्येने एकवटला असून जरांगेंनी उमेदवार उभे करावेत अशी मागणी जरांगेंना करण्यात येत आहे.
ML/ML/PGB 17 Oct 2024