आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक, ईडीची कारवाई
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने सकाळी छापा टाकला होता. सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अमानतुल्ला खान यांना ईडीने अटक करुन सोबत नेले. कथित वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या छाप्यानंतर अमानतुल्ला खान यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर अखेर ईडीने पथकाने खान यांना अटक केली आहे.