कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण

कोल्हापूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या एका भक्ताने देवीच्या चरणी तब्बल 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे. या सिंहाची किंमत तब्बल 50 लाख 33 हजार इतकी आहे. देवीच्या मूर्तीजवळ पूजेसाठी हा सिंह ठेवण्यात आलेला होता. देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा सिंह सुपूर्द करण्यात आलाय. भाविकाच्या इच्छेनुसार त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आल आहे.
सिंह 71 तोळे 100 ग्रॅम वजनाचा आहे. हा सोनं आणि काही प्रमाणात चांदीनं घडवण्यात आला आहे. ज्या भाविकानं हा सिंह दिला आहे त्याने आपलं नाव गुप्त ठेवावे अशी विनंती देवस्थान समितीच्या अध्यक्षाकडे केली होती. त्यानुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. ज्या वेळी हा सिंह दान करण्यात आला त्यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्यासह सचिव शिवराज नायकवडी, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे हे ही उपस्थित होते. या सोन्याच्या सिंहाचे फोटो सोशल सध्या मीडियावर जोरदार व्हायर झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात त्याची जोरदार चर्चा आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL
1 Sept 2024