आघारकर संशोधन संस्थेने लावला बहुपयोगी बायोटिक्सचा शोध

 आघारकर संशोधन संस्थेने लावला बहुपयोगी बायोटिक्सचा शोध

पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या धावपळीच्या आयुष्यात आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने पचन विषयक समस्या वाढीस लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून आहारतज्ज्ञ आहारात प्रोबायोटीकचा अवलंब करायला सांगतात. पुण्यात आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेने एका बहुगुणी प्रोबायोटीक प्रकाराचा शोध लावला आहे.

प्रोबायोटिक्स अर्थात शरीराला हितकारक जैविक घटकांवर जगभरात संशोधन चालू असून, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने बहुपयोगी आरोग्यवर्धक प्रोबायोटिक्सचा शोध घेतला आहे.
आंबवलेल्या पदार्थांत जीवनसत्त्वे, प्रतिजैविके, शिवाय सजीव मित्रजंतू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे पदार्थ ‘प्रोबायोटिक्स’ अर्थात शरीराला हितकारक जैविक घटकांनी युक्त असे असतात. सध्या निरोगी पचनसंस्थेसाठी प्रोबायोटिक्स घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

आघारकर संस्थेतील जैवऊर्जा विभागातील शास्त्रज्ञ डॉ. निलम कापसे आणि संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर यांनी ‘स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस’ या जीवाणूच्या एमसीसीओ २०० या उपप्रकारावर संशोधन केले आहे. हा प्रोबायोटिक्स पचनसंस्थेतील आम्लयुक्त परिस्थितीतही यशस्वीपणे टिकाव धरतो, तसेच आतड्यांना अपायकारक सूक्ष्मजीवांपासून दूर ठेवत असल्याने अनेक रोगांपासूनही बचाव होत असल्याचे प्रयोगशाळेतील संशोधनात समोर आले आहे.

हायटेक बायोसायन्सेस इंडिया लिमिटेडच्या साहाय्याने हे संशोधन करण्यात आले. डॉ. राघवेंद्र गायकेवरी, डॉ. शिल्पा वाघ यांचा प्रामुख्याने सहभाग होता. नुकताच एमडीपीआय मायक्रोऑर्गनिझम या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

SL/ML/SL

7 April 2024

mmcnews mmcnews

Related post