८४ दिवसांसाठी मोफत पाहता येणार हे OTT चॅनल

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही जर Netflix या OTT प्लॅटफॉर्मचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Jio आणि Airtel कंपन्या त्यांच्या काही प्रिपेड प्लॅन्सवर 84 दिवसांसाठी Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मोफत देणार आहेत.
जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात OTT फायदे म्हणून Netflix (Mobile) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत अॅक्सेस मिळतो. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा (4G) आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. मात्र तुम्ही जिओचे 5G नेटवर्क असलेल्या भागात राहता असाल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकतात.
एअरटेलचा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये OTT फायदे म्हणून Netflix (बेसिक) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, Apolay 24/7 सर्कल, मोफत HelloTunes आणि मोफत Wynk म्युझिकचा अॅक्सेस देखील मिळतो. प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3GB डेटा (4G) आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. मात्र जर तुम्ही एअरटेलचे 5G नेटवर्क असलेल्या भागात रहात असाल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकता. (
Airtel प्रमाणे, Jio चा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये OTT फायदे म्हणून Netflix (बेसिक) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत अॅक्सेस मिळतो.
SL/ML/SL
10 March 2024