पंतप्रधान मोदींना Grammy Awards 2024 साठी नामांकन

 पंतप्रधान मोदींना Grammy Awards 2024 साठी नामांकन

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रॅमी’ पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम यामुळे वाखाणले जाते. जगभरातील रचल्या गेलेल्या संगीतांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. भारतीयांसाठी ‘ग्रॅमी २०२४’ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यंदा या पुरस्कारांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. तृणधान्यांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲबडन्स इन मिलेट्स’ या गाण्यातील गीतलेखनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामांकन मिळाले आहे. या गाण्याला फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी संगीत दिले आहे.

मानांकन मिळाले असले तरिही हा पुरस्कार कोणाला मिळणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे. कारण आज रविवार, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लॉस एंजेलिसमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतात मात्र याचे थेट प्रक्षेपणाची वेळ सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून पाहता येणार आहे.

‘ग्रॅमी’ पुरस्कारांचे यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. यावेळी या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दक्षिण अमेरिकन कॉमेडियन-लेखक ट्रेव्हर नोह करत आहेत. याआधी देखील त्यांनी सलग तीन वेळा हा शो होस्ट केला होता. याशिवाय त्यांचीही दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बमसाठी नामांकन मिळाले आहे.

‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कारांचा शो लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही तो ‘CBS’ आणि ‘Paramount Plus’ वर पाहू शकता. हा पुरस्कार सोहळा रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतात त्याच्या थेट प्रक्षेपणाची वेळ सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून असेल. यंदाच्या ‘ग्रॅमी २०२४’ लाईव्ह स्ट्रीमिंग Hulu Plus Live TV, YouTube TV आणि Fubu TV वर पाहू शकता.

आत्तापर्यंत अनेक भारतीय गायक-संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यात पंडित रविशंकर, गुलजार, एआर रहमान, रिकी केज, झुबिन मेहता आणि फाल्गुनी शाह यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. आता यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या ‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कार मिळतो, का याची उत्सुकता सर्वांना लागून राहीली आहे. ‘

SL/KA/SL

4 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *