ठाणे रेल्वे स्थानकात फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ६ लाख दंड वसूल

ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठारे रेल्वे स्थानकात विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळच आहे. खरतर रेल्वेच्या किफासतशीर तिकिट दरामुळे उपनगरातील प्रवाशांना मुंबईमध्ये रोजगारासाठी दररोज प्रवास करणे शक्य होते. तरी देखील फुकट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते.यावर तातडीने मोहिम हाती घेत रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानकात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावर ६९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १७ आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७३१ प्रवाशांवर कारवाई केली आहे. ज्याद्वारे तब्बल ६ लाख २ हजार ६५५ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विविध गर्दीच्या स्थानकांवर विशेष तिकीट तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे रेल्वे स्थानकावर ६९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि दोन अधिकारी, १७ आरपीएफ कर्मचारी टीमने तिकीट तपासणी मोहीम राबवली.
या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान पथकाने ठाणे स्थानकांचा प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, स्थानक प्रवेशद्वार याठिकाणी तिकीट तपासणीस पथकांनी सखोल तिकीट तपासणी राबवली. या मोहिमेदरम्यान १७३१ फुटक्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ६ लाख २ हजार ६५५ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
SL/KA/SL