एलॉन मस्कला मागे टाकत हे ठरले जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्सने नुकतीच अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मोठा झाला आहे. लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार ग्लोबल लक्झरी ब्रँड LVMHचे सीईओ अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती शुक्रवारी 23.6 अब्ज डॉलरने वाढून 207.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर एलॉन मस्क यांच्याकडे 204.5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त संपत्ती आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, 25 जानेवारीला टेस्लाला शेअर बाजारात मोठा झटका बसला आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती 13 टक्क्यांनी घटली. यानंतर एलॉन मस्कची एकूण संपत्ती 18 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. दुसरीकडे, LVMH चे शेअर 13 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. फोर्ब्सच्या मते, शुक्रवारी LVMH चे मार्केट कॅप 388.8 बिलियन डॉलरवर पोहोचले. (Latest Marathi News)
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि एलोन मस्क यांच्यानंतर या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 181.30 अब्ज डॉलर्स आहे. लॅरी एलिसन यांचे नाव चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 142.20 अब्ज डॉलर्स आहे. मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग 139.1 अब्ज संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर वॉरन बफेट, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याबाबत विशेष माहिती
बर्नार्ड अरनॉल्टला आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. लुई व्हिटॉन मोएट हेनेसी या जगातील सर्वात मोठ्या फॅशन ग्रुपचे ते संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. मार्केट कॅपच्या बाबतीत बर्नार्ड यांचा समूह त्यांच्या जवळच्या स्पर्धक केरिंगपेक्षा जवळजवळ चारपट मोठा आहे. LVMH मध्ये 60 उपकंपन्यांमधील 75 लक्झरी ब्रँड आहेत.
SL/KA/SL
28 Jan. 2024