फिल्म फेअर पुरस्कार २०२४, जाणून घ्या विजेते चित्रपट आणि कलाकार

 फिल्म फेअर पुरस्कार २०२४, जाणून घ्या विजेते चित्रपट आणि कलाकार

गांधीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा गुजरातमधील गांधी नगर येथे २७ आणि २८ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आला आहे. काल रात्री फिल्मफेअरमधल्या टेक्निकल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन
कुणाल शर्माच्या ‘सॅम बहादुर’ला आणि ‘अॅनिमल’ला हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर
अॅनिमल चित्रपट

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
सुब्रत चक्रवरती आाणि अमित रे यांच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट एडीटिंग
१२वी फेल साठी विधु विनोद चोप्रा आणि जसकुंवर सिंह कोहली यांना हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
रेड चिलिज वीएफएक्स ‘जवान’ला पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिझाइन
सॅम बहादूर या चित्रपटासाठी सचिन लवलेकर, निधी गंभीर आणि दिव्या गंभीरला हा पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
थ्री ऑफ अस या चित्रपटासाठी अविनाश अरुण धावरे

सर्वोत्कृष्ट कोरियओग्राफी
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील व्हॉट झुमकासाठी गणेश आचार्यला हा पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट अॅक्शन
जवान चित्रपटासाठी स्पायरो रजाटोस, एनल अरासु, यानिक बेन, क्रॅग मॅक्रे, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स

महत्त्वाच्या विभागातील अतिशय लोकप्रिय आणि क्रिटिक्स पुरस्कारांची घोषणा आज रात्री करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट चित्रपट- 12th फेल
सर्वोत्कृष्ट अभिनेता– रणबीर कपूर (अ‌ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक– विधू विनोद चोप्रा (12th फेल)
लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड– डेव्हिड धवन (दिग्दर्शक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता (पुरुष) – आदित्य रावल (फराज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री (महिला) – अलिझेह अग्निहोत्री (फर्रे)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – तरुण दुडेजा (चित्रपट- धक-धक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विकी कौशल (डंकी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक– राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक– विक्रांत मॅसी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – झोराम

SL/KA/SL

29 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *