मानवी डोक्यात चीप बसवण्यास अमेरिकेच्या FDA ची मंजुरी

 मानवी डोक्यात चीप बसवण्यास अमेरिकेच्या FDA ची मंजुरी

न्यूयॉर्क, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक ऍलॉन मस्क यांच्या मानवी मेंदुत चीप बसवण्याच्या प्रयोगाला अमेरिकन एजन्सी FDA ने मंजुरी दिली आहे. ऍलॉन मस्क यांनी Neuralink या नावाने मानवी मेंजूत चीप बसवण्याचा महत्त्वाकांक्षी स्टार्टअप सुरु केला आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युम ट्रायल होणार आहे.

एलॉन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. हा मानवजातीसाठी वरदान ठरणार आहे. या चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार आहे. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीनं 2016 पासूनच मानवी मेंदुत कॉम्प्युटर चीप बसवण्याच्या प्रोजेक्टचं काम सुरु केलं होतं. या प्रोजेक्टअंतर्गत मानवी परीक्षण करण्यासाठी अमेरिकन फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली आहे.

मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. शिवाय स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, अशी माहिती न्यूरालिंकमध्ये कार्यरत संशोधकांनी दिली आहे.

Neuralink च्या क्लिनिकल ट्रायल अंतर्गत, मेंदू संगणक इंटरफेस (BCI) शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूच्या जवळ चीप प्रत्यारोपित केली जाणार आहे. यानंतर चिपच्या हालचालीचे निरीक्षण केले जाणार आहे. यानंतर संगणाकाच्या मदतीने मानवी डोक्यात बसवलेली ही चीप कंटोल केली जाणार आहे. 2030 पर्यंत 22 हजार लोकांच्या मेंदूमध्ये ही चिप बसवण्याचे उद्दिष्ट Neuralink कंपनीने ठेवले आहे.

SL/KA/SL

10 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *