गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची सामुहिक आत्महत्या

 गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची सामुहिक आत्महत्या

सुरत, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील सुरत शहराची सकाळ आज एका भीषण बातमीने उजाडली. दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना गुजरातमधील सूरत इथं घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे, यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळं देशात खळबळ उडाली आहे. या कुटुंबानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळं ही घटना उघडकीस आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे. यांपैकी ६ जणांची विष खाल्यानं तर एकानं फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोटही या कुटुंबानं लिहून ठेवली आहे. प्राथमिकदृष्ट्या यामागे आर्थिक कारण असू शकतं अशी माहिती सूरतचे पोलीस उपायुक्त राकेस बरोट यांनी दिली आहे. मनीष सोलंकी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर इतर सर्वजणांचा मृत्यू विष खाल्यानं झाला आहे. यावरुन मनीषनं आधी कुटुंबातील सर्वांना विष दिलं त्यानंतर त्यानं स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

SL/KA/SL

28 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *