आज चंद्रग्रहण आणि कोजागिरी ही , काय करावे नेमके

 आज चंद्रग्रहण आणि कोजागिरी ही , काय करावे नेमके

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज आश्विन पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा आहे. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी विचारते की ” कोण जागा आहे ? निद्रेतून जागा नव्हे, तर अज्ञान, आळस, अस्वच्छता, अनीती यांच्या निद्रेतून कोण जागा
आहे ? “जे जागे आहेत त्यांच्यावर ती प्रसन्न होते.आज खंडग्रास चंद्रग्रहण आहे. मध्यरात्रीनंतर 1-05 वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल.

https://youtu.be/EUiMG7HMZK4

रात्री 1-44 वाजता ग्रहणमध्य होईल. त्यावेळी 6टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. ग्रहण रात्री 2-23 वाजता सुटेल. आज रात्री कोजागरी आनंदाने साजरी करा. आणि आकाशात चंद्रग्रहणही पहा. यापूर्वी 2004 मध्ये कोजागरीच्या दिवशी चंद्रग्रहण झाले होते.

पुढच्या वर्षी 2024 मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. 7 सप्टेंबर 2025 चे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल . कोजागरीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण 18 ऑक्टोबर 2032 रोजी होईल असे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

ML/KA/PGB
27 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *