मंगलमय वातावरणात श्री महालक्ष्मी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई- तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात काल रात्री करवीरनिवासिनी कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा सोहळा ‘आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात पार पडला.City tour of Sri Mahalakshmi Ambabai in auspicious atmosphere
नवरात्रौत्सवात आठव्या माळेला रविवारी अष्टमीच्या रात्री हा सोहळा
पाहण्यासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अंबाबाईनं अष्टमीच्या रात्री
महिषासुराचा वध केला, म्हणून फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा निघते.
पालकमंत्री हसन
मुश्रीफ यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन देवीच्या पालखीचं पूजन केलं. त्यानंतर परंपरेनुसार रात्री ९.३० वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीचं वाहन नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडलं.
आई अंबाबाईच्या स्वागतासाठी प्रदक्षिणा मार्गावर भक्तांनी
आकर्षक रांगोळ्या आणि
फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.नगर प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
महाद्वारातून गुजरी, भाऊसिंगजी मार्ग या पारंपरिक मार्गावरून पालखी भवानी मंडपात आली. तिथं आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट झाली. इथं छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली.
तिथून वाहन मिरजकर
तिकटीमार्गे गुरू
महाराजांच्या वाड्यावर आलं. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारातून मंदिरात
पोहोचले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली.
त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधली. श्रीपूजकांच्या हस्ते महाकाली मंदिरासमोर अष्टमीचा होम पार पडला.
महालक्ष्मी अन्नछत्र तसंच अन्य सेवा ट्रस्ट आणि भाविकांकडून
ठिकठिकाणी प्रसादाचं वाटप करण्यात आलं.
ML/KA/PGB
23 Oct 2023