आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी

छ संभाजी नगर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात राजकीय नेत्यांना गावाबंदी करण्याचा निर्णय ठीक ठिकाणी घेण्यात येत आहे. आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच तापला असून राज्यभरात मराठा बांधवांकडून आंदोलन मोर्चे सुरू आहेत .
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कोंडी केली असतानाच आता राजकीय नेत्यांनाही गावात प्रवेश बंद घालण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी, बनकिंहोला, वडाळा,धामणी,भराडी, वांगी बु, धानोरा, म्हसला बु, म्हसला खु, चांदापूर, बहूली, गोळेगाव, केळगाव, वडोद चाथा, जलकी घाट, वरूड पिंपरी, चीचपुर सह इतर गावात पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे. या गाव बंदी मुळे राजकीय पुढारयाची चांगलीच गोची झाली आहे.
ML/KA/PGB 22 Oct 2023