कट्टर पंथीय मुस्लिमांना युरोपीय देश दाखवताहेत बाहेरचा रस्ता

 कट्टर पंथीय मुस्लिमांना युरोपीय देश दाखवताहेत बाहेरचा रस्ता

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही वर्षांपासून युरोपीय राष्ट्रांमध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे.यातील बहुतांश नागरिक शांततेने नांदत असले तरी मुस्लिमांमधील काही कट्टर पंथिय व्यक्तींनी त्या देशांची शांतता भंग होईल अशा कारवाया सुरु केल्या आहेत.त्यामुळे आता युरोपिय देशांनी कट्टर पंथिय मुस्लिमांबाबत सावध भूमिका घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सने आपल्या देशातील दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आश्रयाच्या नावाखाली फ्रान्समध्ये राहणाऱ्या २० हजारांहून अधिक मुस्लिम कट्टरपंथीयांना देशातून हाकालपट्टी करण्यासाठीची यादी सरकारने तयार केली आहे.

नुकताच एका शिक्षकाचा चाकूने वार केल्याने मृत्यू झाल्यानंतर फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. आरोपी तरुण मुस्लिम कट्टरवादाने प्रेरित होता.आता फ्रान्समधील धार्मिक स्थळांना मिळालेल्या निधीचीही चौकशी केली जाईल. दहशतवाद व कट्टरतावादाच्या फ्रेंच वॉचलिस्टनुसार काही धार्मिक स्थळांमध्ये कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार केला जात आहे. फ्रेंच सरकारने धार्मिक निधीसाठी २,४५० मशिदींची तपासणी केली आहे.

आश्रयाच्या नावाखाली रशियासह पूर्व युरोपीय देशांतून मोठ्या संख्येने लोक फ्रान्समध्ये स्थायिक होतात. ते फ्रान्सच्या लोकशाहीचा फायदा घेत मूलतत्त्ववादाला प्रोत्साहन देतात. फ्रान्सने २०१७ ते २०२१ दरम्यान ७ लाख लोकांना आश्रय दिला. यातील ६ लाख पाकिस्तान, सीरिया, लिबिया, मोरोक्को व क्रोएशियाचे होते. आता सरकार आश्रय मागणाऱ्यांची संख्या एक लाखावरून ७५ हजारांवर आणणार आहे.

SL/KA/SL

22 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *