हे आहेत यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मानकरी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या अॅनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणं विकसित केली आहेत, ज्याद्वारे अॅटोसेकंदात इलेक्ट्रॉनचं जग पाहता येईल. अॅटोसेकंद म्हणजे १/१,000,000,000,000,000 वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचं वय शोधून काढलं. ब्रह्मांडाचं वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी अगोस्तिनी, क्रॉज आणि हुईलर यांचं संशोधन कामी आलं आहे.
संशोधनाचे महत्त्व
या तीन वैज्ञानिकांनी मिळून अशा प्रकारची उपकरणं विकसित केली आहेत, ज्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन्सचं जग हे अॅटोसेकंदांच्या वेगाने पाहता येईल. एक अॅटोसेकंद म्हणजे एका सेकंदाचा 1/1,000,000,000,000,000,000 एवढा भाग. जगाची उत्पत्ती कशी झाली, इलेक्ट्रॉन्सच्या जगात वेगाने काय बदल घडतात या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी या रिसर्चचा उपयोग होणार आहे.
SL/KA/SL
3 Oct. 2023