सलग 10 व्या आठवड्यात FII ची विक्री सुरूच

मुंबई, दि. 30 (जितेश सावंत): 29 सप्टेंबर रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर सप्ताहात भारतीय निर्देशांक थोड्या फरकाने बंद झाले. F&O एक्सपायरी, डॉलर,मधील वाढ , US रोखे उत्पन्नातील (बॉन्ड यील्ड) वाढ आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, नजिकच्या काळात यूएस मध्यवर्ती बँकांचे दरात कपात न करण्याचे संकेत तसेच एफआयआयच्या सततच्या विक्रीमुळेही बाजार दबावाखाली राहिला.परंतु आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले. FII ची विक्री 10 व्या आठवड्यात सुरूच आहे.
शुक्रवारी डाऊजोन्स 100 पेक्षा जास्त पॉइंटने खाली आला. On Friday, there was a decline of over 100 points in the Dow Jones Industrial Average.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त, सर्व मार्केट 02 ऑक्टोबर 2023 रोजी बंद राहतील. On account of Mahatma Gandhi Jayanti, all segments, equity, F&O, currency, and commodity markets will remain closed on October 02, 2023
गुंतवणूकदारांचे लक्ष 4-6 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचीच्या (MPC) बैठकीकडे राहील.The Reserve Bank Governor-headed six-member Monetary Policy Committee (MPC) meeting is scheduled for October 4-6, 2023.
Technical view on nifty
शुक्रवारी निफ्टीने 19638.3 चा बंद भाव दिला.बाजार कमकुवत झाले आहे.येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19598-19581-19550 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19491-19430-19386-19369–19347-19334-19309-19258 हे स्तर गाठेल वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19698-19726-19744-19798-19848 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.हे स्तर ओढल्यास निफ्टी 19914-19979 चे टप्पे गाठेल.
सेन्सेक्स, निफ्टीची 4 दिवसांची घसरण थांबली.
आठवड्याच्या पहिल्याच सत्रात बाजाराने चार दिवसांच्या विक्रीला विराम दिला आणि सपाट बंद दिला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर झाली आणि ती लाल रंगातच राहिली. तथापि, दुपारच्या सत्राने बाजरात रिकव्हरी झाली आणि निफ्टीने 19,750 च्या जवळ जाण्ययात यश मिळवले परंतु शेवटच्या तासाच्या विक्रीने बाजारातील नफा पुसला गेला आणि बाजार सपाट बंद झाला.
दिवसभराच्या
अखेरीस सेन्सेक्स 14.54 अंकांनी वधारून 66,023.69 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 0.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,674.55 चा बंद दिला. Sensex, Nifty snap 4-day losing run बाजारासाठी
उदासीन दिवस
अत्यंत शांत अश्या सत्रात मंगळवारी बाजार सपाट बंद झाले.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे,निर्देशांक सपाट नोटवर उघडले,दुपारच्या सत्रातील विक्रीने निफ्टीने 19,650 च्या खालची पातळी गाठली. परंतू बाजार बंद होण्याअगोदर तोटा कमी करण्यात यशस्वी झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 78.22अंकांनी घसरून 65,945.47 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 9.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,664.70 चा बंद दिला. A lacklustre day for market
सेन्सेक्स 173 अंकांनी वधारला.
बुधवारी आणखी एका अस्थिर सत्रात, निर्देशांक सकारात्मक बंद होण्यात यशस्वी झाले.सुमारे 6 दिवसांनंतर भारतीय शेअर बाजारांनी पुन्हा वेग पकडला. निफ्टी पुन्हा 19,700 च्या वर पोहोचला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत निर्देशांक नकारात्मक नोटवर उघडले आणि पहिल्या काही तासांमध्ये विक्रीचा वेग वाढला. मात्र, दुपारच्या सत्रात बाजाराने सर्व तोटा पुसून टाकला आणि दिवसाच्या उच्चांकाजवळ बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस
सेन्सेक्स 173.22 अंकांनी वधारून 66,118.69 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 51.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,716.50 चा बंद दिला. Sensex rises 173 points
सेन्सेक्स 610 अंकांनी घसरला
गुरुवारी बाजारातील घसरण वाढली.तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदार सतर्क होते व त्यामुळे त्यांनी विक्रीस प्राधान्य दिले.निफ्टी आयटी निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक घसरला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 610.37 अंकांनी घसरून 65,508.32 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 192.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,523.55 चा बंद दिला. Sensex down 610 points सेन्सेक्स 320
अंकांनी वाढला.
जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे, शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तसेच भारतातील रोखे उत्पन्नात (बॉन्ड यील्ड)घट झाल्यामुळे शुक्रवारी इक्विटी मार्केटला गती मिळाली.बाजाराने दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केली आणि दिवस जसजसा वाढत गेला तसतसा नफा वाढला, सेन्सेक्स 65,000 आणि निफ्टी 19,700 च्या पुढे गेले, परंतु शेवटच्या तासातील नफा बुकिंगने काही नफा पुसला गेला.
दिवसभराच्याअखेरीस सेन्सेक्स 320.09 अंकांनी वधारून 65,828.41 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 114.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,638.30 चा बंद दिला. Easing yields, oil prices lift Sensex 320 pts
( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )
ML/KA/PGB
30 Sep 2023