दादासाहेब फाळके पुरस्कार या ज्येष्ठ अभिनेत्रीला जाहीर

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृ्ष्टीतील सर्वात महत्त्वाचा असलेला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.ट्विटरवरील पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिले की “वहीदा रहमानजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना माझ्या मनात खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे.
वहिदा रेहमान या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांनी गाइड, प्यासा, कागज के फूल आणि चौदवी का चाँद यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभियनाची झलक दाखवली होती. त्यांना यापूर्वी पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार केंद्र सरकारकडून दिला जातो.
दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या शताब्दीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. देव आनंद हे वहिदा रेहमान यांच्या 1965 च्या गाईड या त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटातील सहकलाकार होते. 2002 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले देव आनंद आज 100 वर्षांचे झाले असते. हिदा रहमान यांना या वर्षाच्या अखेरीस एका समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मागील विजेत्या आशा पारेख होत्या आणि त्यांच्याशी वहिदा रहमान यांची घट्ट मैत्री आहे.
SL/KA/SL
26 Sept. 2023