भारतात पुन्हा आणले जाणार चित्ते

 भारतात पुन्हा आणले जाणार चित्ते

छायाचित्र प्रातिनिधिक

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारच्या चित्ता पुनर्वसन प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याच्या फारसे यशस्वीतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात आफ्रिकेतील नामिबियातून आणून सोडलेल्या काही चित्त्यांचा गेल्या वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला. आता सरकार चित्ता पुनर्वसनाचा दुसरा टप्पा सुरु करण्याच्या विचारात आहे. पुन्हा एकदा अफ्रिकेतून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. पर्यावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.पर्यावरण मंत्रालयात वन विभागाचे अतिरिक्त महानिदेशक एस पी यादव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या योजनेबाबत माहिती दिली. यादव हे राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे प्रमुखही आहेत. त्यांनी सांगितलं की, “चित्त्यांची पुढची बॅच दक्षिण अफ्रिकेतून आयात केली जाणार आहे. यावेळी आलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात ठेवण्यात येईल. या वर्षाच्या शेवटी हे चित्ते भारतात दाखल होतील”

चित्ता अॅक्शन प्लॅनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं कुनो अभयारण्यात २० चित्ते राहतील एवढी क्षमता आहे. सध्या या ठिकाणी चित्त्याच्या एका बछड्यासह १५ चित्ते आहेत. देशात आम्ही चित्त्यांची दुसरी खेप आणू तेव्हा त्यांना देशातील इतर ठिकाणी ठेवण्यात येईल. मध्य प्रदेशात आम्ही दोन ठिकाणं चित्त्यांच्या अधिवासासाठी तयार करत आहोत. यांपैकी एक गांधी सागर अभयारण्य तर दुसरं नौरादेही अभयारण्य आहे.

गांधी सागर अभयारण्यात वेगानं तयारी सुरु असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत ही तयारी पूर्ण होईल. आधिवास पूर्णपणे तयार झाल्यानंतर आम्ही एकदा या साईटला भेट देऊ त्यानंतर चित्त्यांना आणण्याचा निर्णय घेऊ, असंही यादव यांनी म्हटलं आहे.

SL/KA/SL

16 Sept 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *