टाईम्सच्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत फक्त एका भारतीय कंपनी

 टाईम्सच्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत फक्त एका भारतीय कंपनी

न्यूयॉर्क, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

जगातील 100 सर्वोत्तम कंपन्याच्या यादीत भारताच्या फक्त एका कंपनीची वर्णी लागली आहे.टाईम मॅगझिन आणि ऑनलाईन डेटा प्लॅटफॉर्म आणि स्टॅटिस्टा यांनी जगाला बदलवून टाकणाऱ्या ७५० कंपन्याची यादी तयार केली आहे. या यादीत ६४ वा क्रमांर मिळवत भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस 100 सर्वोत्तम कंपन्यामध्ये समावेश झाला आहे.ही रॅकींग महसुलवाढ, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासन ( ईएसजी किंवा स्थिरता ) या आधारे केली आहे. या कंपन्याच्या यादीत मायक्रोसॉफ्ट, ॲप्पल, अल्फाबेट ( गुगल संबंधित कंपन्या ) आणि मेटा प्लॅटफॉर्म ( आधीची फेसबुक ) या टेक्नॉलॉजी कंपन्या या यादीत प्रमुख स्थानी आहेत.

गेल्या तीन वर्षांत आर्थिक नफा मिळविण्यासोबतच कंपनीने आपले कार्बन उत्सर्जन करणे, आपल्या बोर्डात अधिकाधिक महिलांची नियुक्ती करणे आणि अन्य सामाजिक दायित्व निभावण्यात पुढाकार घेतल्याने त्यांना उत्तम रॅंकींग मिळाली आहे.

इन्फोसिस शिवाय सात अन्य भारतीय कंपन्याचे टाईमच्या यादीत नाव सामील आहे. त्यात विप्रो लिमिटेड 174 व्या, महिंद्र ग्रुप 210 व्या, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 248 व्या, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड 262 व्या, एचडीएफसी बॅंक 418 व्या, डब्ल्युएनएस ग्लोबल सर्व्हीसेस 596 व्या आणि आयटीसी लिमिटेड 672 व्या स्थानावर स्थान मिळाले आहे. इन्फोसिसला जगातील प्रमुख तीन व्यावसायिक सेवा कंपन्यात स्थान मिळाले आहे.

SL/KA/SL

16 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *