अवघ्या ७ मिनिटांत कॅन्सरवर उपचार करणाऱ्या लशीचा शोध

 अवघ्या ७ मिनिटांत कॅन्सरवर उपचार करणाऱ्या लशीचा शोध

छायाचित्र प्रातिनिधीक

लंडन, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचार जास्त वेळ लागणारे आणि वेदनादायी असतात. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. मात्र आता या उपचारांचा वेळ तीन-चतुर्थांश कमी करण्यात यश आले आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी एक लस शोधली आहे. . ही लस देण्यास फक्त सात मिनिटांचा कालावधी लागतो.

वैद्यकीय अहवालानुसार, Atezolizumab हे ROG.S कंपनी जेनेंटेकद्वारे निर्मिती करण्यात आलेलं इंजेक्शन आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करतं. आरोग्यतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिलं आहे की, एनएचएसच्या रुग्णांना सध्या फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयासह रक्तसंक्रमणाद्वारे उपचार दिले जातात. एनएचएस इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी एटेझोलिझुमॅबवर उपचार सुरू करणाऱ्या सुमारे 3600 रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण वेळ वाचवणाऱ्या या इंजेक्शनची निवड करतील अशी आशा आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने आपल्या एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, औषधं आणि आरोग्य सुरक्षा उत्पादन नियंत्रक संस्थेने या लसीला मान्यता दिली आहे. सध्या कॅन्सर रुग्णांना इम्युनोथेरपी अझेझोलिझुमॅब दिली जाते, जी देण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. निवेदनानुसार, नवीन कॅन्सरविरोधी लस कमी वेळेत दिली जाऊ शकते आणि रुग्णांना होणार त्रास कमी होईल. यामुळे उपचारातील वेळही वाचेल. भारतात दरवर्षी १ कोटीहून अधिक लोकांना कॅन्सरचा सामना करावा लागतो. सध्या उपलब्ध असलेले उपचार हे परिणामकारक असले तरीही त्यांसाठी खूप वेळ लागतो. या रुग्णांसाठी नवीन लस संजीवनी ठरणार आहे.

SL/KA/SL

1 Sept 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *