आपला फोटो वापरला तर कोर्टात खेचण्याचा दिला पवारांनी इशारा

 आपला फोटो वापरला तर कोर्टात खेचण्याचा दिला पवारांनी इशारा

छ . संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे त्यामुळे आमच्यातून फुटून भाजपा सोबत सत्तेत गेलेल्या लोकांनी माझा फोटो वापरू नये अन्यथा त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा शरद पवार यांनी आज दिला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.

निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या हातचे बाहुले आहे त्यामुळे तो त्यांच्या इशाऱ्यानुसार काम करतो . तरीही पक्षाचे चिन्ह आपल्याला च मिळेल असा विश्वास वाटतो असेही पवार यावेळी म्हणाले.

मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महागाई , बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न आदी बाबींचा उल्लेख ही केला नाही उलट मी पुन्हा येईन अशी देवेंद्र फडणवीस यांची भाषा केली . त्यामुळे फडणवीस यांचे काय झाले ते बघता मोदी यांचेही तेच तेच होईल अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

मणिपूरकडे मोदींचे दुर्लक्ष

मणिपूरची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे, मोदींनी तिथे जाऊन तिथल्या जनतेला धीर द्यायला हवा मात्र ते पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे दिसत आहे असे पवार म्हणाले. मणिपूर बाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी मात्र केंद्राचे धोरण ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष करण्याचे दिसते आहे अशी टीका ही शरद पवार यांनी यावेळी केली.

ML/KA/SL

16 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *