टेस्ला कंपनीच्या CFO पदी भारतीय वंशाची व्यक्ती

 टेस्ला कंपनीच्या CFO पदी भारतीय वंशाची व्यक्ती

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदांची सूत्रे अनेकदा भारतीय वंशीय हाती असल्याचे पहायला मिळते. आता यामध्ये अजुन एका कंपनीची भर पडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी टेस्ला (Tesla) कंपनीची महत्त्वाची जबाबदारी भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती दिली आहे. एलॉन मस्क यांनी कार निर्माती कंपनी टेस्लाच्या CFO म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer) पदी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची नियुक्ती केली आहे.

वैभव तनेजा हे 45 वर्षांचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर 2016 मध्ये सोलारसिटी ताब्यात घेतल्यानंतर ते टेस्लाच्या कंपनीमध्ये रुजू झाले. टेस्ला कंपनीने म्हटले आहे की, मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounts Officer) म्हणून त्यांच्या प्राथमिक जबाबदारीव्यतिरिक्त त्यांनी कंपनीमध्ये ‘मास्टर ऑफ कॉईन’ ची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.”

काही दिवसांपूर्वीचं टेस्लाचे भारतात पहिलं ऑफिस पुण्यात सुरु केलं आहे. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला CFO पदाची जबाबदारी देणं हे भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने एलॉन मस्क यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.भारतात प्रवेश केल्यानंतर अमेरिकन वाहन निर्माता कंपनी टेस्लाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केल्याचं जाहीर केलं आहे. टेस्लाचे सीएफओ झाचेरी किरखॉर्न (Zachary Kirkhorn) हे चार वर्षांनंतर CFO पदावरून पायउतार झाले आहेत. आता त्याची जागा भारतीय वंशाचा वैभव तनेजा घेणार आहेत. वैभव तनेजा हे सध्या टेस्ला येथे मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounts Officer) आहेत. त्यांच्यावर आता CFO पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. वैभव तनेजा टेस्ला कंपनीमध्ये 13 वर्षे काम करत आहेत. त्यानंतर त्यांच्या आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

SL/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *