आमिर खानची लेक होणार मराठी घरची सून

 आमिर खानची लेक होणार मराठी घरची सून

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिस्टर परफेक्शनिस्टबॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा आता लवकरच विवाहबद्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयराच्या स्वपनातील हिरो आहे एक मराठमोळा फिटनेस ट्रेनर.त्यामुळे आता आयरा मराठी घरची सून होणार आहे.
बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिरची लाडकी मुलगी इराने 18 नोव्हेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला.त्यानंतर आता हे लग्न कधी होणार याबाबत चर्चा सुरू होती.अखेर त्यांनी ३ जानेवारी रोजी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने Fitnessism ची सुरुवात केली. एवढंच नाही तर तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही ओळखला जातो. तो खूप आधी आयरालाही प्रशिक्षण देत होता. विशेष म्हणजे नुपूरने आयराचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यालाही ट्रेनिंग दिली आहे. आमिर खान आणि आयरा खान व्यतिरिक्त नुपूरने सुष्मिताला जवळपास दशकभर प्रशिक्षण दिलं आहे.

२०२० च्या लॉकडाऊनमध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. नुपूर तिला प्रशिक्षण देत होता. ट्रेनिंग दरम्यानच नुपूर आणि आयरा यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर डान्सरदेखील आहे. त्याने अनेकवेळा त्याचे डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आयराने अधिकृतरित्या २०२१ मध्ये ती नुपूरसोबत नात्यात असल्याचं सांगितलं होतं. आयराने अनेकवेळा नुपूरला तिचा ड्रीम बॉय म्हणूनही सांगितले आहे.

SL/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *